असंच बसल्याबसल्या कॉलेजची आठवण आली (का आली ते नका विचारू), लगेच पाठोपाठ प्रोजेक्ट आठवू लागला. ऑफिसमध्ये काही जास्त काम नव्हतं, म्हटलं एखादी पोस्ट लिहूनच टाकावी प्रोजेक्टवर!
आमच्याकडे प्रोजेक्टच फार फॅड लोकांना! जेव्हा लेक्चरर सांगतो, की येत्या १५ दिवसात तुम्हाला प्रोजेक्टची नावे द्यायची आहेत, सगळ्यांची धावपळ सुरु होते. काही जणांना मी तर प्रोजेक्टची लिस्टच घेऊन येताना पाहिलं. सरकडे जायचं आणि त्यांना एखादा प्रोजेक्ट सांगायचा, त्यांना आवडला नाही की नेट वर बसायचं, आणि दाखवायचं की मी काहीतरी सर्च करतोय. आणि लगेच १-२ तासात नवीन प्रोजेक्टच नाव घेऊन जायचं. आणि शेवटी कसबसं प्रोजेक्ट फायनल झाल्यावर जिथून ती लिस्ट आणलीये, त्याच्याकडे जाऊन प्रोजेक्टची किंमत ठरवायची, असा मस्त बेत असायचा.
माझ्या प्रोजेक्टची कहाणी थोडी वेळी आहे. माझा एक मित्र होता, मी जवळपास दुसऱ्या वर्षापासून त्याच्यासोबत राहत होतो. जेव्हा सरांनी प्रोजेक्टची नावे सुचवा असे सांगितले तेव्हा हा सुट्टीवर गेला होता त्याच्या गावी. कॉलेज चालू होऊन जवळपास १० दिवस झाले होते तरी याचा यायचा पत्ता नाही. म्हणून आम्ही थोडी गम्मत करायचं ठरवल. त्याला फोन केला, आणि सांगितल- "अबे, आज संध्याकाळपर्यंत प्रोजेक्टच नाव द्यायचय, सर म्हणले की जर एखादा पोरगा नसेल तर त्याला तुम्ही प्रोजेक्ट पार्टनर बनवू शकत नाही. तू लगेच इकडे ये. आणि येणार नसशील तर सांग काय करायचं ते!". तो चपापला, पण त्याला घरी राहायचा मोह आवरत नव्हता. तो काही आला नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी फोन करून त्याला सांगितल, "अबे, काल आम्ही खूप प्रयत्न केले, पण सर काही ऐकले नाहीत. मी आणि डक्क्या दोघे मिळून प्रोजेक्ट करणार आहोत. आम्ही एक टॉपिक दिला आणि सरांनी तो मान्य केला". हा लगेच चिडून तिळपापड झाला. दुसऱ्याच दिवशी हा कॉलेजात थडकला. अरेरावीची भाषा चालू केली त्याने! तू असा कसा दुसऱ्या सोबत प्रोजेक्ट करू शकतो? आपण ठरवल होत न, की सोबत प्रोजेक्ट करायचा, मग?
पण तो पर्यंत सगळ्यांना ह्याबद्दल कळून चुकले होते, आणि सगळे पोरं माझी साथ द्यायला लागले. सगळ्यांनी त्याला सांगितल, अरे, सर ऐकत नव्हते. आम्हीही तसंच केल. जे आमचे मित्र नव्हते त्यांना प्रोजेक्ट मधून बाहेर काढल. हा तेवढ्या पुरता शांत झाला. लगेच दुसऱ्या पोराकडे गेला, हा मुलगा त्याच्या रूम्शेजारी राहायचा. त्याला ह्याने माझ्याबद्दल बरेच सांगितले, लई शहाणपणा करतो म्हणे, स्वतःला काय समजतो म्हणे, मी त्याला दाखवतो मी काय चीज आहे ते! प्रोग्रामिंग फक्त ह्यालाच येते काय? आम्ही पण करू शकतो म्हणे!! चल बे, आपण दोघे मिळून प्रोजेक्ट करू म्हणे! आणि त्या दोघांनी युती बनवली. काय काय बोलला तो कोणास ठाऊक?
१-२ दिवसांनी त्याला समजले की हे सगळेजण गम्मत करत होते, मग हा परत त्या पोराकडे गेला. आणि त्याला सांगितल, "अबे प्रसाद्या मजाक करत होता. एक काम कर, तू दुसरा कुणीतरी पार्टनर शोध आणि तू तुझा प्रोजेक्ट कर". आता हा जो मुलगा होता, तो भयंकर संतापला न! त्याने लगेच मला फोन केला आणि बोलावून घेतले. आणि त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या प्रोजेक्ट पार्टनर ने त्याच्याकडे बोलल्या. मी हि संतापलो. आणि त्याला म्हणालो- "मर भडव्या! आता तर खरच मी तुला प्रोजेक्ट मध्ये घेणार नाही. जा खड्ड्यात!". पण माझा तिसरा जो प्रोजेक्ट पार्टनर होता (डक्क्या) , त्याने माझी समजूत काढली आणि ह्याला आमच्या प्रोजेक्टमध्ये घेतल.
त्या दिवशीपासून प्रोजेक्टची तयारी चालू झाली. कुठून सुरुवात करायची, काय काय युज करायचं, कुठली टेक्नोलॉजी वापरायची सगळ ठरल होत. पण हा जो आहे, त्याला आपण "गण्या" म्हणू (खर नाव न सांगितलेलंच बरं) हा गण्या कुठल्याही डिस्कशन मध्ये सहभागी व्हायचा नाही. ह्याच सगळ लक्ष पोरी, जी.एस. इलेक्शन, gathering ह्यात असायचं. आम्ही त्याला बरेच वेळेस समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण हा कधी ऐकायचा नाही. पण मी ही काही कमी नव्हतो, मी सुद्धा ह्याला अद्दल घडवण्याचा प्लान तेव्हाच तयार केला आणि पुढच्या कामाला लागलो.
क्रमशः

No comments:
Post a Comment