Wednesday, October 19, 2011

दिवाळी

चला, आली दिवाळी एकदाची. ऑफिस मध्ये बसल्यावर लोकांच्या गप्पा ऐकत होतो, मी दिवाळीत हे करणारे, मी दिवाळीत ते करणारे. असं काही काही. प्रत्येकाची दिवाळीसाठी प्लानिंग असते, आम्ही अपवाद आहोत त्याला.

आम्हाला दिवाळी म्हणजे एक अशी सुट्टी, कि जिच्यात बोर होत नाही. कारण आमचे सगळे मित्र नांदेडातच असतात त्या वेळात. म्हणून घरी बोर झालं कि जा भाग्यनगरला आणि करा टवाळक्या. पण यावेळेस थोडी शंकाच आहे, सगळे तिथ जमतील कि नाही. कारण बऱ्याच जणांची घरं जरा दूर शिफ्ट झालीयेत आणि ती पोरं अंगापिंडानं चांगलीच वधारलीत. चालणं त्यांना झेपणार नाही.

आणि अशी पोरं आली तरी सोबत टी.वी. घेऊन येतील का, ते सांगता येत नाही. कारण त्यांना टी.वी. शिवाय एक मिनिट चैन पडत नाही. ह्या आण्णाला काही कामं नाहीत, उठसुठ भाग्यनगरला  बोलावतंय.. माझं बालिका वधू , छोटी बहु नाहीतर माझे यम्मलवाड्याचे पिच्चर  मिस व्हायचे  :P असे कॉमेंट्स येतील.

 
जाऊ द्या, टेन्शन नाही! कमीत कमी बारकं आणि जोनराव तरी येईल तिथ. तसं बारक्याला सुद्धा बिग बॉस शिवाय करमत नाही, पण आमच्यासाठी ते एखादा एपिसोड त्यागू शकते :P
 राहिली बारी अतुल्याची, त्याच एकच उत्तर असेल.. अबे पागल.. आत्ता कसं येऊ?
निख्याच काय बाबा, मोठा माणूस आहे ते. एरव्ही आम्हाला भेटायला नं चुकता यायचं ते. पण या वेळेस त्याची जरा कमीच ग्यारंटी आहे. आणि आलं तरी ते विद्युतनगर विद्युतनगर करत बोंबलणार हे नक्की.

बगळ्याची काही खबर नाही. दिवाळीला नांदेडला असल का नाही माहित नाही. असलं तर ते नक्की येईल.
श्रीकांत्याची इच्छा असली तरी ते येऊ शकणार नाही बिचारं! 

बाकी बहुतेक कोणी नाही राहिलं सांगायचं. तुम्हीही भेटून घ्या तुमच्या मित्रांना. कारण पुढच्या दिवाळीच सांगता येत नाही. एखाद्याचे दोनाचे चार हात झाले तर भेटणं मुश्कील होऊन जाईल. काय निख्या? बरोबर नं?

-pk

No comments: