Thursday, October 20, 2011

ग्लास भर चहा, पी.एम.टी. ला बुक्क्या आणि झोम्बाई

हा किस्सा मित्रांकडून ऐकला आहे. बारकं, श्रीकांत्या, हर्श्या आणि निख्या हे सेलू च्या सेहवाग च्या रूम वर गेले होते. सबमिशनचा टाईम होता, आणि नेहेमीप्रमाणे आमच्यापैकी एकाकडेही प्रिंटआउट नव्हत्या. मग तिथून प्रोग्राम लिहा, आणि प्रिंट आउट काढा असा कार्यक्रम ठरला. ठिकाण- सेहवागची रूम.

श्रीकांत आणि झोल दोघेहि प्रोग्राम करण्यात गुंग. आणि निख्याने दुकानातून प्रिंटर आणलं. एक प्रोग्राम झाला (किंवा झोलने कुठून ढापून आणला) कि निख्या टर्र टर्र प्रिंटींग चालू करायचा. एका प्रोग्राम चे १०-१५ प्रिंट्स व्हायचे. असं करत करत रात्रीचे ३-४ वाजले आणि एक एक करत सगळे झोपले.
एवढ्यात सगळ्यांसाठी अनपेक्षित प्रकार घडला. सक्काळी ४.३० - ५.०० च्या सुमारास भांड्यांचा ठन्न ठन्न आवाज येऊ लागला आणि थोड्या वेळात सेहवागने सगळ्यांना उठवलं. हातात ४-५ ग्लास चहा! आणि असं नाही की थोडा थोडा असेल.. फुल ग्लास भरून चहा. आता तुम्हाला वाटेल की सगळ्यांनी सेहवागचं कौतुक केलं असेल, नाही. आधीच थकलेले कार्टे.. खेकसले त्याच्यावर! "तुला काय वेळ बीळ कळते का नाही बे! आत्ता तर झोपलो होतो आम्ही!".. यावर सेहवागची प्रतिक्रिया--"अबे घ्या न बे! अबे घ्या ना बे! थोडा तरी प्या.. चांगला नाही लागला तर फेकून द्या"..


काही दिवसांनी सेहवाग सोबत राहायचा योग आला. तो दिवस आमचा पुण्यातला पहिला दिवस होता. जास्त काही माहिती नव्हती आणि आम्ही डेक्कनलाच अर्धा दिवस फिरत होतो. तो पर्यंत आत्या आणि बाकी कार्यकर्ते कर्वेनगरला रूम पाहून आले होते. आलिशान रूम होती ती, तो भाग वेगळा.
तर सांगायचा मुद्दा हा, कि आत्या आम्हाला तिकडे घेऊन जात होता. आम्ही पी.एम.टी. मध्ये चढलो. 
मी, आतिश आणि एक मित्र थोडे समोरच्या सीटवर बसलो, आणि गजू आणि सेहवाग मागच्या. आत्या सुद्धा पुण्यात नवीनच होता. त्यामुळे कोथरूड पाशी आल्यावर त्याला असं वाटलं कि आपली रूम आली. म्हणून आम्ही उठलो आणि बस च्या दरवाज्या जवळ जाऊन थांबलो.
आमचा सेहवाग लई उतावीळ. त्याला वाटल कि आपला स्टोप आला आणि गज्याला घेऊन तो मागच्या दरवाज्याने उतरला. बस निघाली, आणि सेहवागला कळलं कि आम्ही पुढे जातोय. मग तो ओरडायला लागला. अये प्रसाद्या.. अये आत्या..  मला कोणीतरी आवाज देत असल्यासारखं वाटलं. मी आत्याला म्हणलो - "अबे, कोणीतरी आवाज देतंय आपल्याला".
आत्या- "इथ कोण ओळखीचं आहे आपल्या?"

इतक्यात सेहवाग बसला जोरात बुक्क्या मारायला लागला. बस मधल्या मुली घाबरल्या हा काय प्रकार ते. बहुतेक त्यांना वाटलं असावं कि पुण्यात दंगल चालू झालीये.
तेव्हा माझं लक्ष बाहेर गेलं, आणि आत्याला म्हणलं--" अबे लवकर उतर नाहीतर लोक त्यांच्यासोबत आपल्याला पण झोडपून काढतील".
मग आम्ही ड्रायवर ची माफी मागून पटकन उतरलो आणि त्यामुळे आम्हाला ३-४ किलोमीटर पायी जाव लागलं.
 तो दिवस आठवून आम्ही कित्येक वेळेस लोळून हसलोय..



फायनल वर्ष.. आणि युनिक्स! तुम्हाला आठवतात का हो प्रोसेस स्टेट्स?
असाच एक भोळा माणूस युनिक्स साठी एक्सटर्णल सबमिशन साठी आला. पटेल, डक्क्या आणि सेहवाग होते एकाच ग्रुप मध्ये. त्यांनी पटेलला प्रोसेस स्टेट्स विचारल्या आणि त्याने १-२ सांगितल्या. बाकीच्या डक्क्या ने सांगितल्या. आता बारी आली आमच्या सेहवागची. सेहवागला त्यातील फक्त एकच स्टेट माहिती होती आणि तो आत्यंतिक खुश होऊन झोम्बाई झोम्बाई म्हणत बसला आणि पटेल आणि डक्क्या हसून हसून बेजार!
बाहेर आल्यावर त्यांनी हा प्रकार सगळ्यांना सांगितला. किती लोक हसून खाली पडले, ते मोजायचं विसरलोच आम्ही!

अजून काही किस्से आहेत आमच्या सेहवागचे. सांगू असंच कधीतरी.

-पी.के.

Wednesday, October 19, 2011

दिवाळी

चला, आली दिवाळी एकदाची. ऑफिस मध्ये बसल्यावर लोकांच्या गप्पा ऐकत होतो, मी दिवाळीत हे करणारे, मी दिवाळीत ते करणारे. असं काही काही. प्रत्येकाची दिवाळीसाठी प्लानिंग असते, आम्ही अपवाद आहोत त्याला.

आम्हाला दिवाळी म्हणजे एक अशी सुट्टी, कि जिच्यात बोर होत नाही. कारण आमचे सगळे मित्र नांदेडातच असतात त्या वेळात. म्हणून घरी बोर झालं कि जा भाग्यनगरला आणि करा टवाळक्या. पण यावेळेस थोडी शंकाच आहे, सगळे तिथ जमतील कि नाही. कारण बऱ्याच जणांची घरं जरा दूर शिफ्ट झालीयेत आणि ती पोरं अंगापिंडानं चांगलीच वधारलीत. चालणं त्यांना झेपणार नाही.

आणि अशी पोरं आली तरी सोबत टी.वी. घेऊन येतील का, ते सांगता येत नाही. कारण त्यांना टी.वी. शिवाय एक मिनिट चैन पडत नाही. ह्या आण्णाला काही कामं नाहीत, उठसुठ भाग्यनगरला  बोलावतंय.. माझं बालिका वधू , छोटी बहु नाहीतर माझे यम्मलवाड्याचे पिच्चर  मिस व्हायचे  :P असे कॉमेंट्स येतील.

 
जाऊ द्या, टेन्शन नाही! कमीत कमी बारकं आणि जोनराव तरी येईल तिथ. तसं बारक्याला सुद्धा बिग बॉस शिवाय करमत नाही, पण आमच्यासाठी ते एखादा एपिसोड त्यागू शकते :P
 राहिली बारी अतुल्याची, त्याच एकच उत्तर असेल.. अबे पागल.. आत्ता कसं येऊ?
निख्याच काय बाबा, मोठा माणूस आहे ते. एरव्ही आम्हाला भेटायला नं चुकता यायचं ते. पण या वेळेस त्याची जरा कमीच ग्यारंटी आहे. आणि आलं तरी ते विद्युतनगर विद्युतनगर करत बोंबलणार हे नक्की.

बगळ्याची काही खबर नाही. दिवाळीला नांदेडला असल का नाही माहित नाही. असलं तर ते नक्की येईल.
श्रीकांत्याची इच्छा असली तरी ते येऊ शकणार नाही बिचारं! 

बाकी बहुतेक कोणी नाही राहिलं सांगायचं. तुम्हीही भेटून घ्या तुमच्या मित्रांना. कारण पुढच्या दिवाळीच सांगता येत नाही. एखाद्याचे दोनाचे चार हात झाले तर भेटणं मुश्कील होऊन जाईल. काय निख्या? बरोबर नं?

-pk

Saturday, September 24, 2011

वर्षभराच्या अपडेट्स

गेल्या १ वर्षात बऱ्याच  घडामोडी झाल्या. एकेक करून सांगतो.
बगळ्याचे दोनाचे चार हात झाले. बिबळ्या कंपनी सोडून गेला. कुबड्या खवीस आणि कौटया महाकाळ होते तसेच आहेत. अधून मधून याआआ असं जोराने ओरडणाऱ्या लोकांची चांदी झालीये आणि चोर बोकाळलेत. अरे हो, सायबेरीयन करकोच्याच प्रमोशन झालं, खुश आहे सध्या.

जुने काही मित्र पुण्याला येऊ पाहत आहेत. बघू.. नेहेमीसारख्या थापा आहेत कि खरच येतील ते.
सध्या सांगण्यासारखे जास्त काही नाही म्हणून रामराम!

-पी.के.

पुनरागमन

गेले काही महिने ब्लोग वर पोस्ट करणे जमलं नाही. कामच तेवढ होत.
ब्लोग जेव्हा सुरु केला, त्यावेळेस जरा निवांतपणा होता. आता नाही. 
गेल्या १-२ दिवसात फेसबुकावर मित्रांची कॉलेज विषयी चर्चा चालू होती, विचार आला जरा एखादी पोस्ट लिहावी.
पण तिच्या अगोदर पुनरागमनाची बातमी कळवलेली बरी. म्हणून ही पोस्ट. लवकरच नवीन पोस्ट येईल.

धन्यवाद!